You are currently viewing नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने दोडामार्गात आकाशकंदील व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने दोडामार्गात आकाशकंदील व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

दोडामार्ग

नवकिरण युवामंच सुरुचीवाडी दोडामार्ग संलग्न नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने दोडामार्गात दिपोत्सव 2022 अंतर्गत दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी खुली आकाश कंदील स्पर्धा तर 26 ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय खुली रांगोळी स्पर्धा आयोजित झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या कालावधीनंतर आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे.

आकाश कंदील स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – रोख 5000/-व चषक, व्दितीय क्रमांक – रोख 3000 /-, तृतीय क्रमांक- रोख 2000/- , चतुर्थ क्रमांक – रोख 1500/ तर उत्तेजनार्थ 1 ते 5 क्रमांकाना प्रत्येकी 1 हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक साठी भिंतीवरील घड्याळ देण्यात येणार आहे.

[ 26 रोजी रांगोळी व चित्रकला स्पर्धा ]
दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी 10 वाजता सुरू होणार असून व्यक्ती चित्र हा विषय ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – रोख -5000/- व चषक, व्दितीय क्रमांक – रोख -3000/-, तृतीय क्रमांक – रोख -2000/-, चतुर्थ क्रमांक – रोख -1500/- तर उत्तेजनार्थ- 1 ते 5 स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये देण्यात येणार आहे. तर तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – 3000/-व चषक, व्दितीय क्रमांक – 2000/-, तृतीय क्रमांक – 1000, चतुर्थ क्रमांक – 500/- तसेच उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणाऱ्यांना भिंती वरील घड्याळ देण्यात येणार आहे. याच दिवशी आयोजित चित्रकला स्पर्धेसाठी 1 ते 4 गटाकरिता प्रथम क्रमांक 1 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 700 रुपये, तृतीय क्रमांक 500 रुपये तर उत्तेजनार्थ पहिल्या 5 जणांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. तर इयत्ता 5 ते 7 वि गटाकरिता प्रथम क्रमांक 1 हजार रुपये, व्दितीय क्रमांक- 700 रुपये, तृतीय क्रमांक- 500 रुपये व पहिल्या 5 जणांना उत्तेजनार्थ म्हणून भेटवस्तू देण्यात येणार आहे. तर इयत्ता 8 वि ते 10 वि गटाकरिता वरीलप्रमाणेच पारितोषिक देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संजय शिरोडकर 9420385192, दिपक बुगडे 9404395598, धृव तांबूळकर 7249297580, प्रभाकर मयेकर 9359407299 , विशाल चव्हाण 9168201169 यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा