You are currently viewing झरेबांबर येथे टेम्पो, ट्रकचा समोरासमोर अपघात

झरेबांबर येथे टेम्पो, ट्रकचा समोरासमोर अपघात

झरेबांबर येथे टेम्पो, ट्रकचा समोरासमोर अपघात

दोडामार्ग

झरेबांबर येथे एक टाटा टेम्पो व एक अशोक लेलैंड टक या दोन मालवाहू वाहनांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टाटा टेम्पोच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला असून ट्रकच्या दर्शनी भागाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी ३.१५ वा.च्या सुमारास हा अपघात झाला.टाटा २०७ मालवाहू टेम्पो साटेली भेडशीहूंन दोडामार्गच्या दिशेने जात होती. तर बेळगाव ते गोवा अशी दररोज मालवाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक दोडामार्गहून बेळगावच्या दिशेने जात होता. दोडामार्ग-वीजघर राज्य मार्गावरील झरेबांबर येथे ही दोन्ही वाहने समोरासमोर आली असता त्यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. ही धडक इतकी जबर होती की टेम्पोचे पुढील चाक एक्सेलपासून निखळून आले. केबिन पूर्णतः चेपून काच फुटली. परिणामी चालक केबिनमध्ये अडकून पडला. उपस्थित ग्रामस्थांनी चालकास बाहेर काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा