You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शनिवार दिनांक 29 मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                शनिवार दिनांक 29 मे 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 37 व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरणाबाबत आढावा बैठक, दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व तहसिलदार, महावितरण, पत्तन विभाग व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तालुकानिहाय आढावा बैठक, दुपारी 2 ते 3 राखीव, दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक, दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायं. सोईनुसार ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

00000

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + one =