You are currently viewing “शाळा”… कांन्हा प्रोडक्शन यूट्यूब चॅनेलवर

“शाळा”… कांन्हा प्रोडक्शन यूट्यूब चॅनेलवर

कुडाळ :

कोकणातील सर्वात महत्वाचा सण गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर सर्वात मूर्ती पूजनाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. परंतु अलीकडे पीओपीच्या क्रेझमध्ये मातीच्या मुर्त्या घडविण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. ज्या पारंपारिक मूर्तीकलेने आजपर्यंत हजारो हातांना काम दिले. अतिशय सुबक हाती मुर्त्या बनविल्या त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. तेच हात पीओपीच्या मूर्ती मुळे भविष्यात रिक्त होऊ लागलेत. सर्वसामान्य मूर्तिकारांच्या हातातील कला लोप पावण्याची भीती निर्माण होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि पीओपी मूर्ती पासून निसर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पोहोचणारी हानी विसर्जनानंतर होणारी मूर्तीची विटंबना याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘शाळा’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा लघुपट 5 सप्टेंबर रोजी कान्हा प्रॉडक्शन या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला अशी माहिती निलेश गुरव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 10 =