भारत माता की जय संघटनेने केली गटार सफाई

भारत माता की जय संघटनेने केली गटार सफाई

दोडामार्ग वर्धापनदिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम

दोडामार्ग

दोडामार्ग शहरात बांधकाम विभागाचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. रस्ते व गटाराच्या बाबतीत बांधकाम विभाग पुर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असताना दिसत आहे.बांधकाम विभाग आँफीस पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरील गटारांची साफसफाई आज दोडामार्ग वर्धापनदिनाच औचित्य साधून भारत माता की जय संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी सचिन तेंडुलकर, ओंकार फाटक, वैभव रेडकर,अनिरुद्ध खांबल,गणेश गवस,लक्ष्मण नाईक, प्रणय फाटक, अभिजित फाटक,मधुकर शेटकर,शांताराम शेटकर, राज शेटकर, श्रीराम शेटकर, व शिवराम जाधव आदी भारत माता की जय चे कार्यकर्ते उपस्थित होते पावसाळ्यापूर्वी या गटारांची बांधकाम विभागाच्यावतीने साफसफाई केली पाहिजे होती मात्र ती न केल्याने मुसळधार पडणाऱ्या पावसाचे पाणी गटारातुन न वाहता रस्त्यावर येतं व याचा त्रास हा वाहनधारक तसेच तिथल्या ग्रामस्थांना सहन करावा लागतो.मात्र निद्रिस्त अवस्थेत असलेल्या बांधकाम विभाग याकडे पुर्णपणे डोळेझाक करताना दिसत आहे.त्यामुळे आता तरी बांधकाम विभागाने जागे व्हावे व तुंबलेल्या गटारांची साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकातुन केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा