You are currently viewing दुष्काळ

दुष्काळ

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दुष्काळ*

 

नदी नाले आटले

विहिरी गेल्या खोल.

मातीमध्ये राहिली नाही

जरा कुठे ओल.

 

 

प्यायला पाणी नाही.

जनावरांना चारा नाही.

पाण्यासाठी जो तो

हिंडतो दिशा दाही.

 

 

डोईवर घेऊन हंडा

बाई पाण्याला जाई.

पाण्यासाठी अनवाणी

नुसती चालत राही.

 

 

गाव घर सोडून

माणसे चालली दूर…

डोळ्यांमध्ये दाटलेला

आसवांचा पूर.

 

*अनुपमा जाधव*

*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*

प्रतिक्रिया व्यक्त करा