You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावंतवाडी कारागृहात योगा शिबिराचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावंतवाडी कारागृहात योगा शिबिराचे आयोजन

 

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी योगा शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे साधुन आयोजित केलेल्या या शिबिराला कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचारी व बंदीवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी कारागृह अधिक्षक ब्रह्मदेव लटपटे, कारागृह सुभेदार विनोद शिरगावकर, विनोद खोडके, हणमंत माने, मोईस जुन्नेदी, गणेश धावडे उपस्थित होते. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ मिहीर प्रभुदेसाई, अँड्र्यू फर्नांडिस, दुर्गेश ठाकूर, सिद्देश मणेरीकर,दुर्गेश कुमार लालन यांनी योगाबाबत कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचारी व बंदीवानांचा प्रात्याक्षिकासाहीत मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे यांनी कारागृहात बंदीवानांसाठी योगा शिबिर घेतल्याबद्दल सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आभार मानले.
यावेळी सावंतवाडी मेडीकल मिशनच्या सिस्टर फातिमा फर्नांडीस, जिजम्मा मानी, इसुबली आवटी,अरूण गवंडळकर आदींनी बंदिवानांसोबत सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. या सर्व कार्यक्रमामुळे बंदिवानांचे मनोरंजन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा