You are currently viewing ७ ऑगस्ट रोजी हडपीड स्वामी समर्थ मठात संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

७ ऑगस्ट रोजी हडपीड स्वामी समर्थ मठात संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

श्री स्वामी समर्थ,श्री साईबाबा,  श्री रामदास स्वामी,श्री गगनगिरी महाराज, श्री वासुदेवानंद महाराज टेंबे स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेता येणार

 

देवगड :  श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे ७ ऑगस्ट २०२२ रोजी संतांच्या दिव्य पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. संत पादुकांचे आगमन होणार आहे. मठाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पादुकांचे वाजत गाजत पूजन स्वागत सोहळा होणार आहे. रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ वाजता संतांच्या दिव्य पादुकांची स्थापना, पादुकांवर अभिषेक, पुजन आणि महाआरती, सकाळी ९ नंतर पादुका दर्शन सोहळा, दुपारी १२ वाजता महानैवेध्य, १२.३० वा भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी 3 नंतर स्वामी भक्ती गिते आणि प्रवचन, रात्रौ 8 वाजता समारोप असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे. तरी सर्व भक्तांनि पादुका दर्शन सोहळयास सहभागी होउन संतांच्या अनमोल पादुकांचे दर्शन घेउन आर्शिवाद घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ हडपीड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सदर सोहळा हा श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वर मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त सचिव अक्कलकोट भुषण नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या संकल्पनेतून संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या व्यवस्थापनेत संपन्न होणार आहे.  यावेेेळी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका (पुणे स्वामीभक्त सुंदराबाई काडगावकर यांना महाराजांना दिलेल्या पादुका स्वामी भक्त संदिप काडगांवकर यांच्या घरी प्रस्थापित, सहकार्य श्रीपाद काडगावकर), श्री साईनाथ महाराजांच्या मुळ पादुका (निमोण अहमदनगर, साईभक्त नंदकिशोर निमोणकर यांच्या सहकार्यामुळे), श्री रामदास स्वामींच्या मुळ पादुका कर्जत अहमदनगर (भक्त मोहन बुवा रामदासी यांच्या सहकार्यामुळे), श्री गगनगिरी महाराजांच्या मुळ पादुका (गगनगिरी गड गगनबावडा) महाराजांचे नातु संजयसिंह पाटणकर यांच्या सहकार्यामुळे, श्री वासुदेवानंद महाराज टेंबे स्वामी, मुळ पादुका कुडाळ माणगाव येथील (दिपक साधले यांच्या सहकार्यामुळे ) आदी संतांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार  जोगेश्वरी मुंबई व गाव शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =