You are currently viewing सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सिंधुदुर्गनगरी

सैनिक जिल्हा कल्याण कार्यालय,सिंधुदुर्गच्या अधिपत्याखाली सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह कार्यान्वित असून सदर वसतिगृहाची क्षमता ६० मुलांची आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन दिनांक २० मे २०२४ पासुन प्रवेश पुस्तिका विक्री सुरू करण्यात येईल. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० जून २०२४ आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी, सिंधुदूर्ग यांनी दिली आहे.

 राज्यातील / जिल्ह्यातील सर्व शहीदांच्या वीरपत्नी/माजी सैनिक/सेवारत सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी व त्यांची अनाथ पाल्ये यांनी याचा लाभ घ्यावा. शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये सैनिकी पाल्यांचे प्रवेशाचे प्रमाण कमी झाल्यास इतर नागरीकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश फीचे दर प्रतिमाह पुढीलप्रमाणे आहे.

सेवारत सैनिक माजी सैनिक (सवलतीचे दर) शहीदांच्या वीरपत्नी/माजी सैनिक विधवा, अनाथ व अपंग पाल्य इतर नागरिक
भोजन, निवास व सेवा करासह भोजन, निवास व सेवा करासह थोडक्यात तपशील
अधिकारी जे.सी.ओ शिपाई /एनसीओ अधिकारी व ऑननरी रॅक जे.सी.ओ शिपाई /एनसीओ  

नि:शुल्क

पूर्ण दर
रु. 3,500 रु.3,000/- रु.2,800/- रु. 3,000/- रु. 2,800/- रु.2,500/- रु. 3,500/-

प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम रु. 1 हजार आकारण्यात येईल. प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतिगृह, सावंतवाडी येथे उपलब्ध आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल. शहीदांच्या वीरपत्नी/ माजी सैनिक विधवा, माजी सैनिकांची अनाथ व अपंग पाल्य. माजी सैनिकांचे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असल्यास इतर नागरिक पाल्य. याप्रमाणे प्राधान्यक्र राहील.

 तरी पात्र माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी या कार्यालयाला सहकार्य करुन या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/९४२२०६२८२० वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा