You are currently viewing युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडीच्या वतीने कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल सावंतवाडी पोलिसांचा सन्मान….

युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडीच्या वतीने कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल सावंतवाडी पोलिसांचा सन्मान….

सावंतवाडी

सावंतवाडी पोलीसांनी कोविड महामारीच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांबाबत जलद गतीने तपास करत गुन्हेगारांना अद्दल घडवली.
कोविड महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा केली. शहरातील सर्व धार्मिक सार्वजनिक उत्सवाच्या वेळी कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यशस्वी ठरल्यामुळे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत व त्यांच्या सहकाऱ्यांचा युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडीच्या वतीने सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
यावेळी सहा.पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद, उपनिरीक्षक अमित गोते, शरद लोहकरे, नवनाथ शिंदे, जयराम पाटील, सतिश कविटकर, प्रसाद कदम, भुषण भोवर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, डॉ.मुरली चव्हाण, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, राघवेंद्र चितारी, अर्चित पोकळे, अभिजीत गवस, पार्थिल माठेकर, पंकज बिद्रे, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − four =