बांद्याचा नील बांदेकर वेशभूषा स्पर्धेत राज्यात प्रथम…

बांद्याचा नील बांदेकर वेशभूषा स्पर्धेत राज्यात प्रथम…

बांदा

ऑनलाईन शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. शिवजयंतीचे औचित्य साधून सह्याद्रीचे शिवभक्त सामाजिक संस्था, आम्ही कट्टर शिवभक्त आणि शिवकन्या ग्रुप अमरावती व वर्धा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या यशात त्याला बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा