You are currently viewing मालवण बंदर जेटी किनारपट्टीवर अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी

मालवण बंदर जेटी किनारपट्टीवर अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी

वेगात उलट्या दिशेने गोलाकार कार फिरवत स्टंट

मालवण

मालवण शहरात पुन्हा एकदा अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी शुक्रवारी मालवण किनारपट्टीवर पहायला मिळाली. बंदरजेटी परिसरात पर्यटकांची एक गाडी समुद्र किनारपट्टीवर मोठ्या वेगात गोलाकार कार फिरवत स्टंट करताना दिसून आली. स्थानिकानी त्याला सूचना करूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत आपली स्टंटबाजी चालूच ठेवली होती. त्यानंतर काही वेळाने हे पर्यटन निघून गेले.दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक टेम्पो समुद्रात बुडताना सुदैवाने बचावला. मात्र अतिउत्साही पर्यटकाना किनारपट्टीवर जाऊ नका असे सांगूनही ते ऐकत नसल्याचे चित्र शुक्रवारी पुन्हा एकदा दिसून आले.यापूर्वी अशाच प्रकारच्या दोन घटनांमध्ये समुद्रात गाड्या फसण्याचे प्रकार घडला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 14 =