You are currently viewing राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर वाढदिवस अभिष्टचिंतन.

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर वाढदिवस अभिष्टचिंतन.

वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले अनंत पिळणकर हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व. आपल्या गावाची ओढ समाजकारणाची आवड त्यांना मुंबईतून पुन्हा मूळगावी खेचून घेऊन आली. गोरगरिबांबद्दल कळवळा असणारे अनंत पिळणकर वेळप्रसंगी रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला कधीही धावून जातात. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे कणखर नेतृत्व म्हणून त्यांची कुर्ली परिसरात ओळख आहे.
कुर्ली गावात लोकांच्या कल्याणासाठी ते अविरत झटत राहिले. कुर्ली गाव व नवीन कुर्ली वसाहत येथील अनेक प्रश्न त्यांनी सरकारी कार्यालये फिरून तर कधी आंदोलने करून मार्गी लावले. कुर्ली गावातील प्रश्न सोडवतच त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. देवधर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुर्ली गावातील लोकांचे फोंडा माळरानावर पुनर्वसनाचे प्रश्न, पाणी पुरवठा प्रश्न, स्मशानभूमी तसेच मोफत भूखंड वाटप सारखे प्रश्न त्यानी एकहाती सोडविले. अनेकवेळा अन्यायाविरुद्ध ते कणखर भूमिका घेऊन उभे ठाकले. त्यामुळे चाकरमान्यांच्या अंगात असलेलं शिवसेनेचे रक्त त्यांच्या स्वभावात प्रकर्षाने दिसून आले. गावातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या गरजूंना मदत करण्याबरोबर कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना योद्धा म्हणून देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे.
अनंत पिळणकर हे असे नेतृत्व आहे जे पक्षाच्या जोखंडातच राहिले म्हणजे नेते होत नाहीत, तर ते सर्वसामान्य लोकांच्या हृदयात राहतात. सर्वसामान्य लोकांच्या गळ्यातील ताईत बनून राहणाऱ्या अनंत पिळणकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मनसे मध्ये प्रवेश केला होता. परंतु तिथे ते फार काळ रमले नाहीत. शिवसेना नेते ते मनसे असा प्रवास करत ते राष्ट्रवादीच्या ताफ्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. पक्ष कोणताही असो आपली धडाकेबाज कामगिरी हेच अनंत पिळणकर यांच्या कामाचे तत्व. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे अनंत पिळणकर सर्वसामान्य लोकांचे नेते बनले आहेत.
दोस्ती, मैत्री जपणारे अनंत पिळणकर अन्याय सहन करत नाहीत. अन्यायाविरुद्ध ते पेटून उठतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या विरुद्ध विरोधकांनी अनेक कट कारस्थाने करून त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला, परंतु संकटे आल्यावर पक्षाचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यांना आणखी जोमाने कार्य करण्याचे बळ देते. त्यामुळे ते नव्या उमेदीने कार्यात झोकून देतात. अनेक वर्षे कुर्ली देवस्थानचा वाद मिटत नव्हता, आपल्या ओळखीने सामंजस्याने देवस्थानातील वाद त्यांनी मिटवून गावात शांतता प्रस्थापित केली. त्यामुळेच अनंत पिळणकर हे अनंत आशीर्वाद घेऊन राजकारण आणि समाजकारणात यशस्वी झाले.
अशा या धुरंदर नेत्यास आज वयाच्या ५३ व्या वर्षात पदार्पण करत असताना. संवाद मिडियाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी राजकीय सामाजिक वाटचालीसाठी सदिच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =