You are currently viewing पंढरीच्या पांडुरंगाने वेड लावलंय सिंधुदुर्गातील कला शिक्षकाला

पंढरीच्या पांडुरंगाने वेड लावलंय सिंधुदुर्गातील कला शिक्षकाला

मालवण :

आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक सोहळाच ….

आषाढ वारी साठी ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या वाजत गाजत पायी चालत विठ्ठलाचा जयजयकार करीत पंढरीत दाखल होतात…

वारकऱ्यांबरोबरच पंढरीचा सावळा विठ्ठल महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हृदयात, ध्याना मनात वास करताना दिसून येतो…

पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती किती वेड लावते याचा प्रत्यय वराडकर हायस्कुलचे कला शिक्षक समीर चांदरकर यांनी आपल्या कलाकृतीमधून दाखवून दिले आहे..

समीर चांदरकर यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक दिवस अगोदरच तीन इंच उंचीची चिकन मातीची मूर्ती बनविली असून तिला आकर्षक रंगसंगतीने सजविली आहे.

विठ्ठलाची तीन इंचाची मूर्ती विजेच्या बल्ब मध्ये बसविण्याची कल्पना त्यांना सुचली आणि छोटीशी सुंदर मूर्ती बल्ब मध्ये उतरवताना अनेकवेळा अपयश येऊन देखील “प्रयत्नांती परमेश्वर” या उक्तीप्रमाणे अखेर समीर चांदरकर यांना मूर्ती बल्ब मध्ये बसविण्यास यश आले.

विठ्ठलाच्या प्रति समीर चांदरकर यांनी काव्यरूपी आपल्या भावना देखील प्रकट केल्या आहेत…

*अंधारल्या मार्गावरी*

*कधी रुते पायी काटा*

*तुझ्यासंगे प्रवासात*

*प्रकाशमान जाहल्या वाटा*

*धावून येशील संकटात*

*देसी दुबळ्यांना हात*

*जरी आलो नाही पंढरपुरा*

*तुझी नित्य असे साथ*

 

समीर चांदरकर यांच्या या काव्यातून कित्येकवर्षे अंधारात चाचपडत असलेल्या दिनदुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्य प्रकाशमान करत असल्याचे दिसून येते.

गेली दोन वर्षे कोरोनाने हाहाकार माजवला असता, विठ्ठलाची वारी बंद पडली होती. परंतु कधी डॉक्टर, कधी नर्स, कधी समाजकार्यकर्ता, तर कधी सामान्य कर्मचारी अशा अनेक रुपात पांडुरंगाने वेळोवेळी आपलं अस्तित्व दाखवून दिले होते.

समीर चांदरकर यांच्या हस्तकलेतून साकारलेल्या पांडुरंगाने बल्ब मध्ये उभा राहत आपण भक्तीच्या पाठीशी सदैव असतो हेच जणू दाखवून दिले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा