You are currently viewing काँग्रेसकडून २४ तारखेला जिल्ह्याभरात होणार आंदोलने…

काँग्रेसकडून २४ तारखेला जिल्ह्याभरात होणार आंदोलने…

जिल्हाध्यक्षांची माहिती ; तहसीलदार कार्यालयासमोर होणार उपोषण…

सावंतवाडी

वाढती महागाई कृषी कायदा आदी मुद्द्याच्या विरोधात केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी २६ मार्चला भारत बंद आंदोलन पुकारण्यात आलेल्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयाच्या समोर काँग्रेस कडून २४ तारखेला उपोषण करण्यात येणार आहे,अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली आहे.केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार सकाळी ११ ते ४ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी,युवक काँग्रेसचे पदाधिकारी आदींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + fifteen =