You are currently viewing पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज मंदिरात १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमानिम्मित उत्सव

पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज मंदिरात १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमानिम्मित उत्सव

कुडाळ :

 

पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिर व प.पू. अण्णा महाराज समाधी मंदिरात १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५:३० वा. काकड आरती,सकाळी ६ ते १० पर्यंत राऊळ महाराजांच्या समाधी स्थानी अभिषेक व भाविकांच्या कल्याणासाठी सामूहिक गाऱ्हाणे, १० वा. नामस्मरण ११वा. प.पू. अण्णा महाराजांच्या समाधी स्थानी अभिषेक व पादुका पूजन ,दुपारी १२वा. महाराजांची आरती, दु.१ ते ३ पर्यंत महाप्रसाद, दु.१ ते सायं. ५:३० पर्यंत भजन ,कीर्तन. सायं.५:३९ वा. सप्तसूर महिला भजन मंडळ पिंगुळी यांचे भजन सादरकर्ते -सुनंदा पवार व प.पू. राऊळ महाराज कुटुंबीय महिला मंडळ .७ वा. सांजआरती, रात्री ८वा. महाराजांच्या पादुकांची सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा, १०वा.स्वधारा भजन मंडळ, तांबोळी यांचे भजन बुवा- (अमित तांबोळकर) कार्यक्रम होणार आहेत भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पप्पू राऊळ महाराज सेवा ट्रस्ट पिंगळीने केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =