You are currently viewing एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि अन्य कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि अन्य कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि अन्य कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

देशात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान चालणार्‍या 7 टप्प्यातील लोकसभा निवडणूकांच्या मतदानामुळे अनेक परीक्षांचे या दोन महिन्यातील वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता राज्यात होणार्‍या सीईटी परीक्षेतही बदल केल्याचे कडून सांगण्यात आले आहे.

एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि अन्य कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार, MHT CET 2024 PCB ग्रुपची परीक्षा 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर MHT CET PCM ग्रुपची परीक्षा 2 मे ते 16 मे दरम्यान होणार आहे. यापूर्वी या परीक्षा 16-30 एप्रिल दरम्यान आयोजित केल्या गेल्या होत्या. MAH- AAC CET ची परीक्षा 12 मे दिवशी, MAH- L.L.B.5 Yrs. CET( Five Year Integrated Course) ची परीक्षा 17 मे दिवशी, MH- Nursing CET ची परीक्षा 18 मे दिवशी MAH- B.BCA/BBA/BMS/BBM-CET ची परीक्षा 27 ते 29 मे दिवशी होणार आहे.

पहा सुधारित वेळापत्रक 

सीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या 10 दिवस आधी अ‍ॅडमीट कार्ड्स दिली जातील. सीईटी परीक्षेतील लॉगिन क्रेडेंशिअल्स ही रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट आहे. या माहितीच्या आधारे ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येतील. अ‍ॅडमीट कार्ड वर काही चूक असेल तर त्यामध्ये बदल करून घेण्यासाठी संबंधित विभागाकडे/हेल्पलाईन नंबर वर मदत मागण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा