You are currently viewing संगीत विशारद श्री रुपेंद्र परब यांच्या विद्यार्थ्यांचे यश

संगीत विशारद श्री रुपेंद्र परब यांच्या विद्यार्थ्यांचे यश

सावंतवाडी :

 

नाशिक मध्ये पार पडलेल्या मुक्ता विद्यापीठ युवक महोत्सव 2022 मध्ये तळवडे (परबवाडी) मधील कु. प्रशांत प्रमोद काजरेकर याने शास्त्रीय ख्याल गायन मध्ये प्रथम क्रमांक घेतला तसेच माजगाव मधील कु.कुणाल वारंग याने सुगम गायन तसेच हार्मोनियम सोलो वादन मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही युवकांला नाशिक राहुरी मध्ये होणाऱ्या महात्मा फुले कृषी वद्यापीठ आयोजित “इंद्रधनुष्य 2022” सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या दोन्ही युवकांचे अभिनंदन संगीत क्षेत्रातील जाणकार संगीत विशारद श्री रुपेंद्र परब, श्री एच बी सावंत, श्री विजय माधव, यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा