You are currently viewing वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सवाचे आयोजन करणार – विशाल परब

वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सवाचे आयोजन करणार – विशाल परब

*आपण कमावलेल्यातून काहीतरी दान करण्याच माझे राजकीय गुरू निलेश राणेकडून शिकलोय- विशाल परब*

 

वेंगुर्ले :

वेंगुर्ल्यात भाजपचे युवा नेतृत्व तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसा निमित्त”विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून गोव्याचे आमदार आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक विशाल परब, भाई सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस भाजप मंडल अधिकारी दादा साईल, अक्रम खान, प्रितेश राऊळ, भाई राणे, राजन गिरप, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, अनंत परब, किशोर सनसुरकर, प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, बाळू देसाई, अँड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

विशालची आणी माझी 2008 मध्ये ओळख झाली. अतिशय मनमिळाऊ व स्मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. विशाल च्या सर्व इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असे सांगत विशाल परब यांचे जीवलग मित्र सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शुभेच्छा दिल्या.

तुमच्या शिवाय कार्यक्रम होण शक्य नाही. मी फक्त नाममात्र आहे.संपूर्ण जिल्ह्यात हे जे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी, माझे सहकारी मित्र, प्रेमी यांनी हे आयोजन केलय ते मी आयुष्यात विसरू शकत नाही. यावर्षी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवल की आठ दिवसाचे कार्यक्रम करूया आणी ते पण गोरगरीब जनतेसाठी. आजच मी मुंबईत निलेश राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विनंती केली की १५ ऑक्टोबर ला वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहण्याची. ह्या दोन्ही नेत्यांनी येण्याच आश्वासित केल आहे. मला आनंद आहे महाराष्ट्रातील हे दोन द्विगज नेते एकाच व्यासपीठावर येणार असून त्यांना एकत्र आणण्याच योग मला आणता आला याचा फार आनंद होतोय. मी ६५ कातकरी मुलांना दत्तक घेतलय हा माझ्या जीवनातील एक सर्वात मोठा क्षण आहे. शंभर रूपये कमवले तर दहा रूपये जनतेतील सर्व सामान्य लोकांसाठी खर्च करावेत हे मला निलेश राणेंनी शिकवल आहे. भविष्यात वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सव आयोजन करण्याचा माझा मानस असून तो भव्यदिव्य असेल, अशी घोषणा विशाल परब यांनी आपल्या भाषणातून केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =