You are currently viewing देवगड आगारातून देवगड उमरगा प्रवासी फेरी सुरू-आगार व्यवस्थापक निलेश लाड

देवगड आगारातून देवगड उमरगा प्रवासी फेरी सुरू-आगार व्यवस्थापक निलेश लाड

देवगड आगारातून देवगड उमरगा प्रवासी फेरी सुरू-आगार व्यवस्थापक निलेश लाड

देवगड

रापम देवगड आगारातून स.६ वा. सुटणारी देवगड उमरगा प्रवासी फेरी सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली .
ही प्रवासी फेरी स.६ वा. देवगड येथून सुटून ती गगनबावडा कोल्हापूर मिरज सांगोला मंगळवेढा सोलापूर नळदुर्ग मार्गे उमरगा अशी जाणार आहे व परतीच्या प्रवासाला उमरगा येथून स.६.३० वा. वरील मार्गाने देवगड कडे येणार आहे या प्रवासी फेरीचा प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक देवगड यांनी केले आहे.या पहिल्या प्रवासी फेरीचा मान चालक कम वाहक श्री. ढबाले,आणि केंद्रे हे सेवा बजावीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा