You are currently viewing बाप कधी हरला नाही

बाप कधी हरला नाही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप कधी हरला नाही*

 

जखम झाली मनाला

कधी दाखवली नाही कुणाला.

शरीर खूप थकलं होतं

पण चालणं कधी थांबलं नाही.

जीवनाच्या प्रवासात

बाप कधी हरला नाही .

 

बापाचं जीवन म्हणजे

एक मोठा युद्ध होतं

स्वतःच्या स्वप्नांचा प्रवास थांबून

माझं भविष्य त्यांनी लिहिलं होतं.

स्वतःचे दुःख कधी कुणाला दाखवलं नाही .

आयुष्याच्या जहाजात

बाप कधी हरला नाही

 

अठराविश्व दारिद्र्य घेऊन

बाप माझा जगत होता

मारून पोटाला चिमटा

आमचे भविष्य पाहत होता

दोन वेळचे अन्न

त्यांनी कधी खाल्ले नाही.

आम्हाला खाऊ घातल्याशिवाय

स्वतः कधी झोपला नाही

कठीण प्रसंगात

बाप कधी हरला नाही

 

फाटक शर्ट

नेट करून घातले.

बापाचं माझ्या काळीज

भाऊ गेल्यावर तुटलं होतं

थकले होते शरीर

परंतु कधी खचला नाही.

आयुष्याच्या या वळणावर

बाप कधी हरला नाही.

 

संस्काराच्या घरामध्ये

शिक्षण कमी पडू दिलं नाही.

घामाने भिजलेल्या माझ्या बापाने

आम्हा कधी हरू दिलं नाही.

दुःखाच्या या सागरात

बाप कधी हरला नाही

 

दुःखांच्या काट्यावर

बाप माझा चालत होता .

परंतु खचून जाऊन

हार कधी मानली नाही .

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर

बाप कधी हरला नाही

 

भारती वसंत वाघमारे

मंचर

प्रतिक्रिया व्यक्त करा