सिंधुदुर्गात नेटवर्क मार्केटिंग पर्सन्स यापुढे आपल्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून एकवटणार!

सिंधुदुर्गात नेटवर्क मार्केटिंग पर्सन्स यापुढे आपल्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून एकवटणार!

*”अर्न” (Elite Association for Rights of Networkers) संस्थेची आज कुडाळात बैठक

सिंधूदुर्ग जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने तरुण वर्ग गेली कित्येक वर्षे पूर्णवेळ नेटवर्क मार्केटिंगचे काम करत असून त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आला आहे. मात्र समाजातील काही स्वयंघोषित पुढारी, विघ्नसंतोषी व फायद्यासाठी आलेले लोक त्यांना स्वतःला नेटवर्क बिझिनेसबद्दल काहीही माहिती नसताना नेटवर्क करणाऱ्या लोकांना खूप हीन दर्जाची वागणूक देताना आपल्या नजरेसमोर येत आहे.

अशावेळी नेटवर्क करणाऱ्या काही लोकांना खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. काही लोकांकडून दमदाटी देणे, फायदा न झाल्यास गाड्या काढून घेणे,चेक लिहून घेणे असे अनेक प्रकार होत आहेत. अशा प्रकारे नेटवर्कर मंडळींवर अन्याय होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. या अन्यायाविरोधात आणि नेटवर्कर वर्गाच्या अनेक प्रश्नांबाबत आज बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

संस्थेचे प्रवर्तक श्री रौनक पटेल यांनी म्हंटले आहे की अन्य कोणीही मसिहा येऊन आपले हे प्रश्न सोडूवू शकत नाही. आजपर्यन्तचा इतिहास पाहता, यापुढे आपल्यालाच एकत्र येऊन आपले प्रश्‍न सोडवावे लागतील, अशी स्पष्ट कल्पना घेऊन मी आपल्याला हे एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. आपण या महत्त्वाच्या विषयावर एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवून घेऊया.

यासाठीची संस्थेची बैठक आज  शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता भास्कर अपार्टमेंट, मनवा रेस्टॉरंट समोर, तनिष्क शोरूम च्या बाजूला आयोजित केली आहे. सर्व नेटवर्कर्सनी आपली उपस्थिती राखावी, तसेच आपल्या संपर्कामध्ये असलेल्या इतर नेटवर्क लीडरपर्यंत ही बाब पोहोचवावी असे आवाहन श्री रौनक पटेल (+918446887318) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा