You are currently viewing कोमसाप सावंतवाडीतर्फे ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

कोमसाप सावंतवाडीतर्फे ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मालवणी कवी, गीतकार दादा मडकईकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.

ज्येष्ठ इतिहासकार साहित्यिक डॉ.जी. ए. बुवा यांच्याहस्ते दादा मडकईकर यांचे पुष्पगुच्छ, पुष्पहार तसेच ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला आणि पेढा भरवून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मालवणी साहित्यात दादांनी आभाळा एवढी उंची गाठली असून गेली अनेक वर्षे मालवणी भाषा समृद्ध करण्यासाठी, जपण्यासाठी सातत्याने मालवणी भाषेत कविता लिहीत आहेत. स्वतःच संगीत देऊन चाल लावून उत्कृष्ट गायनाचे कार्यक्रम देखील करत आहेत. मालवणी साहित्यासाठी अविरत झटणाऱ्या दादा मडकईकर यांचा कोमसाप सावंतवाडी शाखेकडून झालेला अभिष्टचिंतन सोहळा हा दादांच्या कार्याचा गौरव आहे.

यावेळी सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष श्री.संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जिल्हा शाखेचे खजिनदार भरत गावडे, सदस्य कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सावंतवाडी कोमसाप शाखेतर्फे लवकरच दादा मडकईकर यांच्या मालवणी कवितांचा रंगारंग कार्यक्रम घेण्याचा संकल्पही सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा