You are currently viewing पंचविसाव्या ‘क्षितिज इंटरनॅशनल चाइल्ड आर्ट कॉम्पिटिशन’ या चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

पंचविसाव्या ‘क्षितिज इंटरनॅशनल चाइल्ड आर्ट कॉम्पिटिशन’ या चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

पंचविसाव्या ‘क्षितिज इंटरनॅशनल चाइल्ड आर्ट कॉम्पिटिशन’ या चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

सावंतवाडी

ऑगस्ट २०२३ घेण्यात आलेल्या ‘क्षितिज इंटरनॅशनल चाइल्ड आर्ट कॉम्पिटिशन अँड एक्झिबिशन’ या चित्रकला स्पर्धेत प्रशालेतील एकशे बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत जगभरातील विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यामध्ये पेंटिंग विभागात इयत्ता ४ थी मधील कु. भुवन पुंडलिक दळवी, इयत्ता ५ वी मधील कु. अस्मि धीरज सावंत व इयत्ता ३ री मधील जान्हवी दत्तात्रय सावंत या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले.
तसेच, ‘ग्रीटिंग कार्ड बनवणे’ या स्पर्धेत इयत्ता १ ली मधील कु. आस्था कपिल कांबळे व कु. जान्हवी आनंद जानकर यांनी रजत पदक प्राप्त केले.
कार्टूनचे चित्र व रंगकामामध्ये इयत्ता ५ वी मधील कु. श्लोक विराग मडकईकर यांनी सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली. त्याचप्रमाणे, फोटोग्राफी मध्ये इयत्ता ४ थी मधील कु. गौरीश दिपक परब याने सुवर्णपदक पटकावले. शिक्षक विभागात कलाशिक्षिका सौ. सुषमा विठ्ठल पालव यांना सुवर्णपदक मिळाले. तर, कला शिक्षिका कु. विनायकी जबडे व मुख्याध्यापिका दिशा कामत यांना कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजेत्या मुलांचे व मार्गदर्शक, शिक्षकांचे प्रशालेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी विशेष कौतुक केले. व विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा