You are currently viewing आंबडपाल येथे रंगणार डबलबारी भजनाचा जंगी सामना

आंबडपाल येथे रंगणार डबलबारी भजनाचा जंगी सामना

कुडाळ :

उत्साही मित्रमंडळ आंबडपाल, श्रीदेवी गिरामाऊली मित्रमंडळ नाईकवाडी आंबडपाल आयोजित *कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना* श्रीदेवी गिरामाऊली मंदिर, नाईकवाडी आंबडपाल येथे होणार आहे.

या डबलबारीच्या स्वागत समारंभासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री अमरसेन सावंत, शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख श्री रुपेश पावसकर आणि कॉन्ट्रॅक्टर श्री किरण नलावडे उपस्थित राहणार आहेत.

ही डबलबारी श्री कोटेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळ हरकुळ, *बुवा श्री अभिषेक शिरसाट, गुरुवर्य प्रमोद हर्यान बुवा, पखवाज रूपेश परब, तबला हितेश पिळणकर* प्रतिस्पर्धी *श्री भुलेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड, बुवा श्री संतोष दत्ताराम जोईल, गुरुवर्य श्रीधर बुवा मुनगेकर, पखवाज श्याम तांबे, तबला अक्षय मेस्त्री* यांच्यात रंगणार आहे. तरी सर्व भजन रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − six =