भाजपचा कोलगावात झंझावाती प्रचार

भाजपचा कोलगावात झंझावाती प्रचार

सावंतवाडी

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत कोलगाव ग्रामविकास पॅनलन प्रचाराचा नारळ फोडला. ग्रामदेवता श्री देवी सातेरी, श्री देव कलेश्वर यांना श्रीफळ अर्पण करण्यात आल. भाजप नेते महेश सारंग यांच्या उपस्थितीत या इझंझावाती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोलगाव ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत कोलगाव ग्रामविकास पॅनलनचा झेंडा फडकणार असा विश्वास भाजप नेते, जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप नेते महेश सारंग, जि. प.सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राउळ, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, मंदार कल्याणकर, बांदा सरपंच अक्रम खान, दादू कविटकर, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, महेश धुरी, चंदन धुरी, राजन कुडतरकर, संदीप हळदणकर, दिनेश सारंग, संतोष राउळ, अपेक्षा नाईक आदिसह उमेदवार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा