You are currently viewing मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ उल्का कुलकर्णी लिखीत अप्रतिम कथा*

**मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे**

किती सुंदर असतं ना ते बंधन. एकमेकात विरघळणार, एकमेकांचा आधार बनणारं, एकमेकांची काळजी करणारं. एकमेकांना जपण्यातलं निस्वार्थपणातलं , त्यागातलं तर कधी आपुलकीतलं, तर कधी व्यक्त होण्यातलं.

प्रसंग पहिला : पती-पत्नीच्या नात्यातला.

मोहन ऑफिसमधून आला ते गुणगुणतच. ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है की जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए’ .आल्यावर मंजिरी ने पाणी दिले आणि चहा करण्यासाठी ती आत वळली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात त्याचे मन भूतकाळात गेले.
मोहन च्या लग्नाचा विषय घरात सुरू होता. पण प्रत्येक मुलीत काही ना काही कारण सांगून त्याचे नाकारणे सुरूच होते. त्यातच ‘मंजिरी भिडे’ हेही स्थळ आले होते. परंतु मोहनने या चांगल्या स्थळाला ही नकार दिला. कारण त्याचे नेहा वर प्रेम होते. व त्याला तिच्याशीच लग्न करायचे होते. शेवटी मुलाच्या हट्टापुढे आई-वडिलांचे काही चालले नाही. नेहा ‘बडे घर की बेटी’ होती. लग्न थाटामाटात पार पडले. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. मोहनच्या मध्यमवर्गीय घरात ऍडजेस्ट करताना नेहाला जड जात होते. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कुरबुरी नंतर वाद, विचारांची तफावत, यामुळे भांडणे विकोपाला गेली. परिणामी दोघांनी विभक्त होण्याचे ठरवले. लग्नानंतर दोनच वर्षात परिस्थिती जैसे थे झाली. पण आल्या प्रसंगामुळे मोहन पुरता कोसळून गेला.
आयुष्य आ वासून उभे होते. अशातच परत त्याच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला. मामांनी एक स्थळ आणले. मुलगी मनमिळावू ,सुस्वभावी होती. पण ती ही मोहन सारखीच घटस्फोटिता होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आधी नाकारलेली ‘मंजीरी भिडेच ‘ होती. या योगायोगाचे सर्वानाच आश्चर्य वाटत होते. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. त्याप्रमाणे एका वळणावर चुकामूक होऊनही ती वळणे परत एकत्र आली होती. आणि एकमेकांचा आयुष्याचा आधार बनणार होती. अधुरं नात जपायची संधी आयुष्याने त्यांना परत दिली होती आणि शांत झालेले सनई चौघड्या चे सूर परत निनादू लागले होते.

प्रसंग दुसरा : प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातला

त्यादिवशी वैभव च्या आते भावाचे लग्न होते. घरची सर्व मंडळी आठ दिवसापासून आत्याकडे मुक्कामाला होती. वैभव ही दोन-तीन दिवस सुट्टी काढून आत्याकडे गेला. स्नेहल ,आत्याच्या नणंदेची मुलगी. लहानपणापासून वैभव तिला पाहत होता. त्याला ती आवडत होती. दोघांच्याही मनात प्रेमाचे बी रुजत होते. आणि हळूहळू ते आकार घेत होते. आणि एक दिवस प्रेमाचा साक्षात्कार दोघांकडूनही अभावितपणे व्यक्त केला गेला.पण, नात्यांमध्ये संबंध हे स्नेहल च्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे हे प्रेम दोघांच्याही मनातच राहिले. घरच्यांसमोर उघड झालेच नाही.

तशातच स्नेहल चे लग्न ठरले. स्नेहल दिसायला सुंदरच होती. त्यामुळे तिला घर ही खूप छान मिळाले होते. तिच्या सुखात कशाचीच कमी नव्हती. परंतु नियतीच्या मनात तिचे सुख पाहणे नव्हते. अगदी लग्नानंतर एकाच वर्षाने कार एक्सीडेंट मध्ये तिचा नवरा गेला. तोपर्यंत तिला बाळाची चाहूल लागली होती आणि त्यानंतरचे आयुष्य म्हणजे तिच्यासाठी विराण वाळवंट होते. कारण हक्काचा माणूस आज तिच्याबरोबर नव्हता. सासरचे टोमणे तिला सहन होत नव्हते. त्यामुळे वडिलांनी तिला कायमचे माहेरी आणले. आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिची मुलगी ही आता एक वर्षाची झाली होती. आणि लग्नाच्या निमित्ताने वैभव ची आणि तिची पून्हा भेट झाली.
स्नेहल ची सर्व कहाणी ऐकून वैभव ला खूपच वाईट वाटले. तिचा तो शांतपणा , सर्वांनाच असह्य होत होता. पण त्यातल्या त्यात , तिच्या जगण्याचे एक कारण म्हणजे तिची मुलगी होती. मुलीसाठी तरी तिला जगणे भाग होते. आत्याला, तिच्या वडिलांना, तिचीच काळजी असायची. बर , दुसरे लग्न करून द्यायचे म्हटले तर, पदरात एक मुलगी होती. आणि याच जबाबदारी सहित तिच्याशी कोण लग्न करणार होते? आणि ही तयारी वैभवने स्वतः दाखवली. फक्त तिचा विचार करून. नियतीने जरी तिचे सोभाग्य काढून घेतले तरी, वैभव च्या रूपाने परत तिच्या समोर आणले होते. आणि उघड न झालेल्या प्रेमाचा विजय झाला होता. एका वळणावर ते प्रेम दोघांना परत मिळाले होते. आणि सर्वांना तिच्या काळजीतून मुक्त करून वैभवने, तिच्याबरोबर आनंदाने संसार थाटला. तिच्या भावनांना जपत.

प्रसंग तिसरा : भाऊ बहीण नात्यातला

रेवती तशी संसारात खूष होती. दोन मुले ,नवरा असे चौकोनी कुटुंब समाधानी होते. पण अचानक वादळ यावे तसा तो दिवस तिच्या आयुष्यात आला. शरीरावर अचानकपणे सूज येऊ लागली. मग त्यासाठी ची ट्रीटमेंट सर्व तपासण्या सुरू झाले. आणि निदान झाले की, एक किडनी फेल झाली आहे, आणि दुसऱ्या किडनीचे कामही मंदावले आहे. दुसरी किडनी ही फेल होण्याच्या मार्गावर आहे. आणि असेच चालू राहिले तर रेवतीच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
देव , रेवतीचा एकुलता एक भाऊ. जरा फोन केला की लगेच धावत येणारा. रेवती ची मनापासून काळजी करणारा. हे ऐकल्यावर तर, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांशी डिटेल मध्ये बोलणे झाल्यावर, देवला समजले की, कोणी किडनी डोनर मिळाला तर, रेवती चे पुढचे आयुष्य सुखात जाऊ शकते. जी किडनी फेल झाली आहे त्या ठिकाणी दुसरी किडनी बसवून , एका किडनी वर शरीराचे कार्य व्यवस्थित चालू शकते. देवने जराही विचार न करता, स्वतःची एक किडनी रेवतीला देण्याचे ठरवले. आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट झाली. आणि रेवतीला एक बोनस आयुष्य मिळाले. भावाच्या आधाराने. भावाच्या नात्याला खऱ्या अर्थाने देवने जपले होते

प्रसंग 4 : मित्र-मैत्रिण नात्यामधला

एम एस सी बी चे ट्रेनिंग आज सुरू होणार होते. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून कॅंडिडेट आले होते. त्यामध्ये प्रियांका मुंबईतून आणि श्रेयस नाशिक हुन आला होता. आठ दिवसांच्या ट्रेनिंग मध्ये दोघांची स्वभावाची wev length खूप छान जुळली. श्रेयसला तिच्या गोड स्वभावाची भुरळ पडली. नकळत त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. ट्रेनिंग संपल्यानंतर, श्रेयस ने आपले मन तिच्याकडे मोकळे केले. प्रियांकाने ही त्याच्या भावनेचा आदर केला. व सांगितले की” माझे लग्न ठरले आहे”.
हातातून काहीतरी निसटून जात असल्याची जाणीव श्रेयसला झाली. पण नाईलाज होता. त्याने लगेच स्वतःला सावरून घेतले. आणि प्रियांका ला सांगितले, “एक तुझा चांगला मित्र म्हणून कायम मला आठवणीत ठेवशील ना, आणि कधीही तुला आधाराची गरज वाटली तर हक्काने या मित्राकडे यायचे. मैत्रीच्या बंधनाने कायमच मी तुझ्यासाठी बांधलेला आहे. ही मैत्री आयुष्यभर जपायची संधी मला दे.
आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

सौ उल्का कुलकर्णी ✍️ नाशिक

Advertisement

*⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩‍💻_*

*🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-*
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)

*# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #*

*📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा. 8605992334*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा