You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कट्टा येथे रक्तदान शिबिर संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कट्टा येथे रक्तदान शिबिर संपन्न

भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांच्या वतीने आयोजन

मालवण :

मा.पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर आयोजित ‘सेवा पंधरवडा’ अभियान देशभर सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा पंधरवडा भरगच्च कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. अभियानाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील कट्टा येथे रक्तदान शिबिराने करण्यात आला.मालवण तालुक्यातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत हा उपक्रम यशस्वी केला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, मामा माडये, जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, संदीप मेस्त्री, आशिष हडकर, राजन माणगांवकर, मामा बांदिवडेकर, शेखर पेणकर, शेखर मसुरकर, पप्या तवटे, संतोष पुजारे, स्वप्नील चिंदरकर, ललित चव्हाण, सुमित सावंत, मंदार पडवळ, जगदीश चव्हाण, विजय निकम, सागर माळवदे व इतर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + six =