You are currently viewing 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे

14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे

14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे

 सिंधुदुर्गनगरी 

 पी एम.किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी यांना पुढील वितरित होणाऱ्या १४ व्या हफ्त्याचा लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक असल्याचे प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी, दोडामार्ग यांनी कळविले आहे.

            पहिली बाब ई-केवायसी साठी जवळील सामाईक सुविधा केंद्रामध्ये जाऊन ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, किंवा नवीन आलेले फेस रेकॉग्निशन ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ई-केवायसी करता येते. याशिवाय पी एम किसानच्या अधिकृत पोर्टल वर ही फारमर कॉर्नर वर ओटीपी आधारित सुविधेचा वापर करून शेतकरी ई-केवायसी करू शकतात, दुसरी बाब म्हणजे बँक खाते आधार सलग्न करणे  यासाठी त्या बँकेत शेतकरी यांनी खाते आधार लिंक करावे. अथवा पोस्टमास्तर मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. आपल्या गावातील कृषी सहायक यांची या कामासाठी मदत शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी, दोडामार्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा