कणकवली :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेणार आहेत.
