You are currently viewing स्मृति भाग २१

स्मृति भाग २१

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग २१*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
व्यास महर्षि वा महर्षि व्यास असाच उल्लेख कुठेही वाचावयास मिळतो . मग प्रश्न असा पडतो की ऋषि व महर्षित फरक काय ? शब्दकल्पद्रुम नावाचे ग्रंथात ऋषि शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे —

*” ऋषति प्राप्नोति सर्वान् मन्त्रान्*
*ज्ञानेन पश्यति संसारपारं वा , सः ऋषिः ।”*
जे कष्ट करतात , सर्व मन्त्र मिळवतात ( मानवमात्राचे कल्याणासाठी ! केवळ विशिष्ट जातिवर्गासाठी वा धर्मवर्गासाठी नाही ! हे समजून घ्या ! ) आणि स्वतःचे ज्ञानाने संसाराच्या पलिकडील म्हणजे भविष्यातील संभाव्य घटनांचा वेध घेवू शकतात , ते ऋषि ! अशा ऋषिंचे १) ऋषि ( चार्वाक , वालखिल्य इ. ) , २) महर्षि ( वेदव्यास , अत्रि , भारद्वाज , जमदग्नि इ.) , ३) राजर्षि ( विदेही जनक महाराज — सीतेचे वडिल ) , ४) देवर्षि ( नारद ) व ५)ब्रम्हर्षि ( प्रथम वशिष्ठ आणि नंतर विश्वामित्र ) असे पाच प्रकार आहेत व हे उत्तरोत्तर श्रेष्ठत्व धारण करतात .
योगेश्वर कृष्णाने अर्जुनास निमित्त करुन समग्र जगतास जे सांगितले ते पुढील प्रमाणे —

*ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।*
*ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः॥*
हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषिंनी पुष्कळवेळा सांगितले आहे . निरनिराळ्या वेदमंत्रातून ही विभागपूर्वक सांगितले आहे . तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तिसंगत ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे .
असे ऋषिवर्णन जेंव्हा प्रत्यक्ष योगेश्वर गातो , तेंव्हा ऋषि किती मोठे ! ही कल्पनाच केलेली बरी !! आणि अशा मोठ्या ऋषिंना खोटे ठरवण्याची ताकद ( ती ही दुसर्‍या संस्कृतीचे लोकांनी कान भरल्यावर ! ) आम्ही ठेवतो व चुकीचे वागतो , तर आम्ही ऋषिंपेक्षा खरंच मोठे आहोत ना ? आणि मग एखादा कोरोनाचा गुगली *तो* टाकतो आणि नररुपातील पशुंचा भार एकदम कमी करतो ! सांगणे एवढेच की ऋषि खरंच मोठे आहेत . त्यांचं ऐकावं .

*सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः ।*
*पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥*
हे जे सर्व उपनिषदरुपी गाईंचे दोहन करुन श्रीकृष्णाने जे गीतारुपी सार वत्स पार्थास पाजले , ती उपनिषदे ही ऋषिंचीच देणगी ! पण ती वाचल्यावर पैका थोडीच मिळतो ? अधिभौतिकवाद वा विज्ञान शरीराचे चोचले पुरवते व अध्यात्म मन नावाचे इन्द्रियास पुष्ट करते , भावजीवन पुष्ट करते , मनास सुदृढ करते , मनाचे रंजन करते , मनावर बुद्धिचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते , मन अविचल बनवते आणि समर्पणाची विचारधारा पल्लवित करते ! हे कधी समजावे माझ्या देवबांधव वा देशबांधवांना ?
विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − four =