You are currently viewing इचलकरंजीत वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देत गणपती बाप्पाला निरोप

इचलकरंजीत वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देत गणपती बाप्पाला निरोप

ढोल – ताशांसह बेंजोच्या वाद्याच्या गजरात – जयघोषात
अधिकाऱ्यांसह कर्मचारी तल्लीन

इचलकरंजी येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मद्यपान करुन वाहन चालवू नका ,नाहक प्राण गमावू नका तसेच लागता कान मोबाईलला ,थांबवा वाहन साईडला असा वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देणारे फलक वाहनावर
लाऊन आज बुधवारी सवाद्यासह मिरवणूक काढून लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.सकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून
सजवलेल्या वाहनातून ढोल – ताशा व बेंजोच्या वाद्याच्या गजरात व जयघोषात
अधिकाऱ्यांसह कर्मचारी तल्लीन होत विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होऊन ती मुख्य मार्गावरुन पंचगंगा नदीकाठ परिसरात आणण्यात आली.यावेळी महापालिकेच्या कृञीम कुंडामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.या विसर्जन मिरवणुकीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी व भाविक सहभागी झाले होते.

इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने
शिवतीर्थ परिसरातील कार्यालयात दरवर्षी लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते.यंदाच्या वर्षीही अगदी भक्तीमय व उत्साही वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.या काळात नित्यनेमाने विधीवत पुजाअर्चा व आरती करण्यात येत होती.त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कायम कर्तव्य बजावणा- या वाहतूक पोलीस कर्मचा-यांमध्ये भक्तीमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.यानिमित्ताने काही काळासाठी का असेना त्यांच्या मनावरील कामाचा कमी झाल्याचे दिसून आले.
आज बुधवारी सकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून पाॅप्युलर वाहन ट्रेनिंग स्कूलच्या फुलांनी
सजवलेल्या वाहनातून
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.या मिरवणुकीत ढोलताशांसह बेंजो वाद्याच्या गजरात व जयघोषात तल्लीन होत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी सामील झाले होते.शहरातील मुख्य मार्ग असलेल्या शिवतीर्थ परिसर ,मलाबादे चौक ,गांधी पुतळा चौक , राजवाडा चौक ,नदीवेस नाका या मार्गे सदर गणपती बाप्पाची मिरवणूक काढून ती पंचगंगा नदी काठ परिसरात आणण्यात आली.यावेळी गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष व
जड अंतःकरणाने महापालिकेच्या कृञीम कुंडामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी व भाविक उपस्थित होते.या मिरवणुकीचे सारथ्य पाॅप्युलर वाहन ट्रेनिंग स्कूलचे प्रमुख दीपक रावळ – पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 8 =