You are currently viewing जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता….

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता….

सिंधुदुर्गनगरी : 

जिल्ह्यात येते चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवला आहे. त्या अनुषंगाने योग्य ती खबदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आल्या आहेत.

            जिल्ह्यात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर दिनांक 11 व 12 सप्टेंबर 2020 रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

            त्या अनुषंगाने नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.  कोणतीही अनुचित घटना घडल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७/१०७७ आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८६१४, तहसील मालवण नियंत्रण कक्ष (०२३६५)२५२०४५, तहसील देवगड नियंत्रण कक्ष (०२३६४) २६२२०४, तहसील वेंगुर्ला नियंत्रण कक्ष (०२३६६)२६२०५३, दोडामार्ग नियंत्रण कक्ष (०२३६३)२६२२०४, सावंतवाडी नियंत्रण कक्ष (०२३६३)२७२०२८, कुडाळ नियंत्रण कक्ष (०२३६२) २२२५२५, कणकवली नियंत्रण कक्ष (०२३६७)२३२०२५, वैभववाडी नियंत्रण कक्ष (०२३६७) २३७२३९ येथे संपर्क साधावा.     असे आवाहन शुभांगी साठे,  निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारीअधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 7 =