You are currently viewing कुडाळ औद्योगिक विकास क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

कुडाळ औद्योगिक विकास क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

बांदा

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे वैद्यकीय शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य कामगारांना जीवनावश्यक चाचण्या मोफत करून मिळाव्यात व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत व्हावी या दृष्टिकोनातून आज २३१ कर्मचाऱ्यांची मोफत रक्त तपासणी तसेच डोळे तपासणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचा उद्देश फक्त तपासण्या करण्याचा नसून तपासणीचे रिपोर्ट काढून त्यावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व चष्मा वाटप काही दिवसात करण्यात येणार आहे.

कुडाळ येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन रोटरीच्या असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नीता गोवेकर यांच्या हस्ते झाले यावेळी कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष अमित वळंजू, रोटरी क्लब कुडाळचे सचिव दिनेश आजगावकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण केंद्राच्या केंद्र प्रमुख सौ. सुश्मिता नाईक, ग्लोबल फाउंडेशनचे लक्ष्मण देसाई, समुपदेशक मानसिंग पाटील, कोकण संस्थेचे समुपदेशक समीर शिर्के, अवंती गवस, प्रदीप पवार, कुणाल चव्हाण, अजय चव्हाण, प्रथमेश सावंत, बबलू परब, समृद्ध राणे यांनी मेहनत घेतली.

यावेळी रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष अमित वळंजू यांनीआरोग्य शिबिराचे महत्व आणि गरज याबाबत मार्गदर्शन केले तर कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव ऍड. नकुल पार्सेकर यांनी सर्वांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + ten =