You are currently viewing देवगड येथे मच्छीमाराचा मृत्यू..

देवगड येथे मच्छीमाराचा मृत्यू..

देवगड

येथील नौकेवरील एका मच्छीमाराचा मृत्यू झाला. प्रशांत प्रभाकर चरकरी (वय ४७, रा. मावळंगे लोहारवाडी, रत्नागिरी), असे त्याचे नाव आहे. तो नौकेवरून पाण्यात पडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चरकरी कामावर असलेली नौका शुक्रवारी (ता. १४) पहाटे विजयदुर्गच्या दिशेने मच्छीमारीला गेली होती. दुपारच्या सुमारास ते पडवणे जवळील समुद्रात पडल्याचे आढळले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. हवालदार आशिष कदम अधिक तपास करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा