You are currently viewing उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 टोपीवाला स्मारक तंत्रशाळा-तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या शासकीय संस्थेतून शैक्षणिक सत्र 2007 पासून ते शैक्षणिक सत्र 2021 पर्यंतचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड फॅशन डिसायनिंग या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके  घेऊन जाण्याचे  आवाहन टोपीवाला स्मारक तंत्राशाळा- तंत्रमाध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.फ. पाटील यांनी केले आहे.

            विद्यार्थ्यांनी त्वरीत ओळखपत्र व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र व गूणपत्रिका  कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 6 वा.पर्यंत व शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत, व सुट्टचे दिवस वगळून घेऊन जावे. कार्यालयीन दुरध्वनी संपर्क 02363-272076, प्रशिक्षण विभाग मोबा. 7798576769 या क्रमांवार संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी  केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − seventeen =