You are currently viewing ओटवणे गावात पूरस्थिती, अनेकांच्या घरात शिरले पाणी…

ओटवणे गावात पूरस्थिती, अनेकांच्या घरात शिरले पाणी…

लाखोंचे नुकसान; पोल्ट्रीत पाणी घुसल्याने ४०० कोंबडी गेली वाहून…

सावंतवाडी

दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ओटवणे गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
येथील रवळनाथ मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी पोहचले होते. तर काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली. तर पोल्ट्री व्यवसायिकांच्या कोंबडया वाहून गेल्याने नुकसान झाले. बाचावकार्यासाठी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा पोहचली नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले

प्रतिक्रिया व्यक्त करा