You are currently viewing करूळ भुईबावडा घाट उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

करूळ भुईबावडा घाट उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

करूळ भुईबावडा घाट उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

सर्व वाहतूक फोंडाघाट मार्गे होणार असल्याने, अपघात टाळण्यासाठी ट्राफिक पोलीस ची नियुक्ती करावी – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

*करुळ – भुईबाबावडा घाट उद्या पासुन बंद होणार आहे. आंबोली घाटातही अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असल्याने सर्व वाहातुक फोडाघाट मार्गे वळवण्यात येणार आहे. लक्झरी बसेस, कंटेनर तसेच इतर गाड्या या सर्व फोंडाघाट बाजार पेठे मार्गे वळवण्यात येत आहेत. फोंडाघाट बाजारपेठेत अवजड वाहनांची गर्दी होऊ नये तसेच अपघात होऊ नयेत, यासाठी कणकवली पोलीस स्टेशन किंवा होमगार्ड याना ड्युटी द्यावी. ट्राफिक पोलीस यांनी अवजड वाहने एक – एक दोन दोन करत सोडावीत, जेणेकरून बाजारपेठेत गर्दी न होता अपघातही टाळता येतील. तसे न केल्यास मोठे आदोलन उभारावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी कणकवली पोलीस स्टेशनला दिला आहे. तसेच उद्या आमदार नितेशजी राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा