कणकवली शहर घर तेथे कोरोना होण्याची भीती….शिशिर परुळेकर

कणकवली शहर घर तेथे कोरोना होण्याची भीती….शिशिर परुळेकर

कणकवली

गेल्या 8 दिवसात कणकवली शहरात कोरोना पॉझिटीव्ह संख्या झपाट्याने वाढत असून दिवसाला दुहेरी संख्यने वाढ होत आहे.शहरातील सर्व भागात ही संख्या वाढत असून शहराबाहेरील कलमठ गावातही ही संख्या वाढत आहे.आज ओरोस जिल्हा रुग्णालयात सर्व बेड फुल्ल झाले आहेत त्याचप्रमाणे शहरातील इतर कोविड सेंटर देखील फुल्ल झाल्याने होम आयसोशियन शिवाय पर्याय नाही असे चित्रनिर्माण झाले आहे.
मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाणी पिणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे , हात स्वच्छ ठेवणे ह्या सर्व गोष्टी कॉमन आहेत परन्तु रोगापुढे शहाणपणा चालत नाही असेच चित्र एकंदरीत आहे. उद्या ह्या महामारीचा मी पण रुग्ण होऊ शकतो .
या सर्व बाबींवर विचार केल्यास कोविड चा प्रसार थांबविण्यासाठी त्याची चेन तोडणे आवश्यक आहे त्यासाठी शहरातील सर्व घटकांना एकत्र विचार करून उत्स्फूर्तएकीचे प्रदर्शन केले पाहिजे.
ज्याच्या दारात रुग्णवाहिका थांबून सायरन वाजविते त्याला त्याचे गांभीर्य समजते पण तोवर वेळ गेलेली असते कोविड रुग्णाला हॉस्पिटलमध्ये किमान 9 दिवस आणि नंतर घरी 10 दिवस असे किमान 19 दिवस क्वारंनटाईन व्हावे लागते आणि नंतर समाज त्याला पुढील 10 ते 15 दिवस टाळतो आणि ह्याचा त्रास एकट्याला नाही तर आख्या कुटुंबाला होतो .आज राज्यात आणि देशात अनलॉक ची प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासन या बाबतीत गंभीर नाही त्यामुळे प्रशासन याबाबत कोणत्याही स्वरूपाचा गंभीर निर्णय घेणार नाही हे सत्य आहे.
माझी कणकवली शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आणि मनपूर्वक विनंती आहे की या बाबत सर्वांनी गंभीर विचार करावा आणि ही साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा कडकडीत बंद पाळून कोरोना संकटावर मात करावी . आपण जर बुद्धिभेदाच्या लढाईत अडकलो तर ही महामारी आपले सर्वांचे जीवन उध्वस्त करेल असे मत शिशिर परुळेकर नगरसेवक, नगरपंचायत कणकवली यांनी व्यक्त केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा