You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्तीसाठी ९ रोजी कुडाळला जिल्हा बैठक..

सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्तीसाठी ९ रोजी कुडाळला जिल्हा बैठक..

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढकाराने ओसरगाव टोलमुक्तीसाठी पाऊल उचलण्यात आले आहे. याच अनुषंगाने टोलमुक्त सिंधुदुर्ग व्हॉट्सअप समूह स्थापन करण्यात आला आहे. या समुहाच्या माध्यमातून ९ डिसेंबर रोजी सायं. ४ वा. कुडाळ-उद्यमनगर येथील श्री वासुदेवानंद सरस्वती सभागृहात सर्व जिल्हावासीयांची एक व्यापक प्रातिनिधीक बैठक महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. रा. म. क्र. ६६ वरील नियोजित ओसरगाव पथकर नाका हटविण्यासंदर्भातील आंदोलनाची पुढील दिशा यावेळी ठरविण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन टोलमुक्त सिंधुदुर्गचे निमंत्रक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nine =