You are currently viewing तळेरे हायस्कूलमध्ये प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडीक यांचा २३ वा स्मृतिदिन

तळेरे हायस्कूलमध्ये प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडीक यांचा २३ वा स्मृतिदिन

स्व. वामनराव महाडीक म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर – रमाकांत वरूणकर

सामान्य जनतेच्या मनातले असामान्य नेतृत्व म्हणजे आप्पा – चंद्रकांत तळेकर

आप्पांची विद्वता, विचारांचा ठेवा सांभाळून ठेवा- रमाकांत वरुणकर

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथे विद्यालयाचे संस्थापक स्व. प्रि. वामनराव महाडीक उर्फ आप्पा यांचा २३ वा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तळेरे गावचे ग्रामस्थ , देणगीदार तसेच सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे चे संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरूणकर यांनी भूषविले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आप्पांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाळा समिती सदस्य प्रविण वरुणकर , निलेश सोरप, संतोष तळेकर,प्रशालेचे जमीन देणगीदार हितेंद्र खटावकर,जयेश ढेकणे,प्रतिकेश तळेकर, चंद्रकांत तळेकर , प्राचार्य अविनाश मांजरेकर, पत्रकार संजय खानविलकर , सतिश मदभावे , प्रमोद कोयंडे , ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, डी.सी.तळेकर, एन. बी. तडवी, पी. एम. पाटील, पी. एन. काणेकर, प्राध्यापिका ए. बी. कानकेकर, ए.पी. कोकरे, एन.पी. गावठे, व्ही.डी. टाकळे , ए. बी. तांबे, एस. यु. सुर्वे , एस. एन. जाधव , शिक्षकेतर कर्मचारी ज्येष्ठ लिपिक आर.जी. तांबे, के.डी. तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर ,विद्यार्थी , पालक आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनीं १६ मार्च १९२५ ते १२ऑक्टोबर १९९९ या ७४ वर्षाच्या कालखंडातील वामनराव महाडीक उर्फ आप्पांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याच्या दैदिप्यमान वाटचालीचा उल्लेख करून आप्पांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व वामनराव महाडीक यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात यावेळी वृक्षारोपन करण्यात आले .

अध्यक्षीय भाषणामध्ये रमाकांत उर्फ दादा वरूणकर म्हणाले, आप्पांनी तळेरे परिसरात मुबलक पाण्याची सोय व्हावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले या शैक्षणिक संकुलाच्या उन्नतीसाठी खूप कष्ट घेतले. स्व. वामनराव महाडीक म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर होते. आप्पांची ही विद्वता तसेच राजकीय इतिहास व त्यांच्या विचारांचा ठेवा जपून ठेवा असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.याप्रसंगी विद्यालयासाठी देणगी म्हणून पाच हजार रुपये त्यांनी जाहीर केले. शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर यांनी स्वतः विद्यार्थी दशेत असताना आप्पांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा दाखला दिला.

आप्पा सामान्य परिस्थितीतून गेल्यामुळे त्यांनी गरिबांशी अत्यंत जवळीकतेचे नातं निर्माण केलं होते. सामान्य जनतेच्या मनातले असामान्य नेतृत्व म्हणजे आप्पा असे त्यांच्या स्वभावाचे पैलू माजी शाळा सदस्य चंद्रकांत तळेकर यांनी उलगडून सांगितले.प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आप्पांच्या एकूणच कार्याचा संपूर्णपणे आढावा घेतला तसेच आम्ही सर्व शिक्षक या प्रशालेत काम करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.
प्रशालेची बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थीनीं स्नेहल संतोष तळेकर, विराज संजय नांदलस्कर,मिताली गोपाळ चव्हाण तसेच अकरावी कला शाखेचा विद्यार्थी भाग्येश पाटकर यानींही आप्पांना शब्दसुमनाने आदरांजली वाहिली. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांनी आपल्या प्रस्ताविकामधून कार्यक्रमाची रूपरेषा तसेच उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्राध्यापिका एन.पी.गावठे यांनी केले तर आभार सहायक शिक्षिका पी.एम.पाटील यांनी मानले.

स्व वामनराव महाडीक स्मृतिप्रित्यर्थ विद्यालयाच्या वतीने निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष , पत्रकार संजय खानविलकर यांच्या हस्ते वृक्षारोपन सोबत इतर मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 1 =