You are currently viewing सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षकपदी बाबू उर्फ आत्माराम तेली यांची बढती

सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षकपदी बाबू उर्फ आत्माराम तेली यांची बढती

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक बाबू उर्फ आत्माराम तेली यांना पोलिस उपनिरिक्षकपदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचे पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. लवकरच त्यांना कार्यभार देण्यात येणार आहे. श्री. तेली यांनी सावंतवाडी बांदा कणकवली कुडाळ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्राईम ब्रँच या शाखेत आपली सेवा बजावली आहे. आता नवी जबाबदारी मिळाल्याने ते सावंतवाडीचे उपनिरीक्षक होणार आहेत त्यांच्या या बडतीमुळे माणगावात आनंदाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा