You are currently viewing शिरवल विठ्ठल रखुमाई मंदिर, येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिरवल विठ्ठल रखुमाई मंदिर, येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिरवल विठ्ठल रखुमाई मंदिर, येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

७ मे ते १४ मे या कालावधीत होणार विविध कार्यक्रम

भाविक भक्त, वारकरी यांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा – ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज आणि विश्वस्त मंडळ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टने केले आवाहन

कणकवली

गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपार्शिवादाने व ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शिरवल टेंबवाडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरीनाम सप्ताह व ९ वा वर्धापनदिन सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन मंगळवार, दि. ७ मे २०२४ ते मंगळवार, दि. १४ मे २०२४ या कालावधीत आयोजित केले आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग,सर्व वारकरी व शिरवल गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

व्यासपीठ व मार्गदर्शन ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे, शेगांव करणार आहेत.

गजर माऊलीचा उत्सव किर्तनाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ‌७ मे १३ मे या कालावधीत रोज रात्री ८ ते १० वाजता नामवंत किर्तनकार आपली किर्तनरुपी सेवा सादर करणार आहेत.
०७ मे । ह.भ.प. ओंकार सुर्यकांत सावंत, शिरवल

०८ मे । ह.भ.प. रामचंद्र महाराज कदम, कुंदे

०९ मे । ह.भ.प. भूषण महाराज वरखले, आळंदी

१० मे । ह.भ.प. नंदू महाराज तेलंगे, रायगड

११ मे । ह.भ.प. श्रीकृष्ण घाटे महाराज, देवगड

१२ मे । ह.भ.प. डॉ. रविंद्र महाराज तावडे, कुडाळ

१३ मे । ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगांव १४ मे । ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगांव
किर्तन सादर करणार आहेत.

दररोज होणारे कार्यक्रम सकाळी ५ ते ६.३० काकड आरती* सकाळी ६.३० ते ७.३० श्रींची महापूजा,
सकाळी ८ ते १२ ग्रंथवाचन, दुपारी १२.३० ते २.०० महाप्रसाद, दुपारी ३ ते ५.०० ग्रंथवाचन, सायं. ६.३० ते ७.३० हरिपाठ,*रात्रौ ८ ते १० किर्तन* रात्रौ १० नंतर महाप्रसाद,

दि. १० मे २०२४ रोजी दुपारी ४.३० ते ५.३०: महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ

दि.१३ मे २०२४ रोजी नववा वर्धापन दिन सोहळा, सकाळी ५.३० ते ६.३०: काकड आरती,सकाळी ९ ते १२ : ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सकाळी ६.३० ते ८.३० : अभिषेक व महापूजा,दुपारी १ ते ३ महाप्रसाद,* सायं. ४ ते ६ : ग्रंथदिंडी रवळनाथ मंदिर शिरवल पर्यंत सायं. ६.३० ते ७.३० दीपोत्सव,*रात्रौ ८ ते १० : किर्तन ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे

दि. १४ मे २०२४ रोजी सका. ९.३० ते ११.३०: काल्याचे किर्तन ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे यांचे होईल.

मृदृंगसाथ ह.भ.प.निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस), कु. गजानन राणे, कु. दर्शन गवंडळकर, श्री. संजय सावंत, कु. सचिन लाड काकड आरती : ह.भ.प.तारी महाराज, ह.भ.प. प्रकाश सावंत (भिरवंडे), ह.भ.प. सामंत, फोंडाघाट, श्री. सूर्यकांत सावंत, श्री. आबा भिसे, श्री. सदा राणे, श्री. कृष्णा सावंत, घोटगे आदी साथ देणार आहेत.

तरी सर्व भाविक भक्त, वारकरी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज आणि विश्वस्त मंडळ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, शिरवल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा