You are currently viewing आता क्रेडीट कार्डच्या आधारे होणार युपीआय पेमेंट

आता क्रेडीट कार्डच्या आधारे होणार युपीआय पेमेंट

ग्राहकांसाठी सुविधा वाढणार :आरबीआयकडून झाली घोषणा

आगामी काही दिवसांमध्ये क्रेडिटकार्डला ही युपीआय लिंक करण्याची सुविधा मिळणार आहे. ज्याच्या मदतीने व्यवहार करणे अगदी सोपे होणार आहे .भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया (आबीआय)यांनी या संदर्भात बुधवारी घोषणा केली आहे .

या नव्या बदलाची सुरुवात रूपे क्रेडीट कार्डपासुन होणार आहे. यामध्ये युपीआय ग्राहकांना फक्त डेबिटकार्ड आणि सेव्हिंग व चालू खाती जोडता येऊन याच्या आधारे व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. युपीआयसोबत जोडण्यासाठी फक्त एनपीसीआयशी संबंधित असणारे निर्देश सादर करण्यात येणार आहेत.

युपीआय व रूपे कार्डसह अन्य पर्यायांमधून करता येणारा व्यवहार, व्यापाऱ्यांना व्यवहारांची रक्कम एका निश्चित टक्केवारीत करता येणार आहे.

*असा व्यवहार केल्यास शुल्क लागू होणार की नाही?*

आरबीआयने केलेल्या या नवीन घोषणेनंतर अजून क्रेडिटकार्ड लिंक केल्यावर करण्यात येणाऱ्या युपीआय व्यवहारांसाठी मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर )कसा लागू होणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र या व्यवहारांवर शुल्क लागू होणार का नाही ही बाब अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा