You are currently viewing उबाठा ने मराठी माणसाला लुटले;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे

उबाठा ने मराठी माणसाला लुटले;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे

उबाठा ने मराठी माणसाला लुटले;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे

*मराठी माणसाने वडापाव खाऊन राहावे आणि राऊत च्या मुलीने वाइन कंपनी उघडावी हे यांचे मराठी प्रेम

कणकवली:

मराठी माणसावर बोलण्याचा अधिकार संजय राऊत ला नाही.मराठी माणसावर अन्याय कोण सहन करणार नाही. उबाठा ने मराठी माणसाला लुटला आहे. मात्र मराठी माणसाच संरक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे. मराठी माणसाने नोकरी करावी वडापाव खाऊन राहावे आणि राऊत च्या मुलीने वाइनची कंपनी उघडावी. हे योग्य आहे का? असा सवाल करतानाच सेना,भाजप वर टीका करताना भाषा सांभाळून वापरा भाषेची स्पर्धा लागली तर तुम्ही दिसणार नाही. तुम्हाला शरद पवारांची एड*** टोळी बोलायचे का.? असा रोख ठोक सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
पाकिस्तान च्या बिलावल भुट्टो ची भाषा संजय राजाराम राऊत करत आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीला मत म्हणजे पाकिस्तान ला मत आहे. पाकिस्तान ची भलावण करणाऱ्या संजय राजाराम राऊत सह इंडिया काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. संजय राऊत हा महाराष्ट्रातील बिलावल भुट्टो आहे . असा घणाघात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला. आमदार रोहित पवार बारामती च्या सभेत रडले तो धागा पकडून फिल्मफेअर चे कॉमेडी अवॉर्ड अजून शिल्लक आहे. कॉमेडी अवॉर्ड रोहित पवार ला देण्याची शिफारस करतो असे सांगत नितेश राणे यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले काल च्या जाहिरातीवरून चोर की दाडीमे तिनका असलेल्याचे दिसले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी कर्नाटक मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर पाकिस्तान झिंदाबाद म्हणत पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. स्वतःला नेतेमंडळी म्हणणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या बापाला खुश करण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली जात आहे.संजय राजाराम राऊत हा हिंदू राहिलेला नाही. भांडुप मध्ये बसून पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो ची भाषा करत आहे. संजय राऊत हा महाराष्ट्रातील बिलावल भुट्टो असल्याची टीका नितेश यांनी केली. त्यामुळे मतदारांनी आपले मत देताना पाकिस्तानात फटाके फुटता नये याची काळजी घ्यावी असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा