You are currently viewing विशाल परब यांच्या माध्यमातून न्हावेलीत भात बियाण्यांचे वाटप…

विशाल परब यांच्या माध्यमातून न्हावेलीत भात बियाण्यांचे वाटप…

विशाल परब यांच्या माध्यमातून न्हावेलीत भात बियाण्यांचे वाटप…

सावंतवाडी

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून न्हावेली-पार्सेकरवाडी येथील ग्रामस्थांना मोफत भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. विशाल परब आणि श्री देव माऊली घोडेमुख युवक कला-क्रीडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पावसाळ्याच्या तोंडावर बियाणे मिळाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी श्री. परब व मंडळाचे आभार मानले. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण कायमच सहकार्याच्या भावनेतून मदत करू, असा विश्वास त्यावेळी व्यक्त केला. यावेळी मंडल अध्यक्ष प्रसाद गावडे, उपाध्यक्ष समीर पार्सेकर, सचिव मोहन पालेकर, खजिनदार तुळसिदास पार्सेकर, संपर्क उपाध्यक्ष राज भवन, सुंदर पार्सेकर, बाबा गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा