You are currently viewing मोती तलावात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली…

मोती तलावात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली…

मोती तलावात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली…

सावंतवाडी

येथील मोती तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली. खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. ते येथील भटवाडी भागात राहत होते. खंदारे यांच्या दुचाकीला १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यात त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते आजारी होते. आज सकाळी आपल्या चुलत सुनेला बाजारातून जाऊन येतो, असे सांगून ते निघून गेले होते. पण उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते.
दरम्यान आज दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह मोती तलावाच्या पात्रात आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यांचा मुलगा मुंबईत राहत असल्यामुळे ते आपल्या पुतण्याकडे भटवाडी येथे राहत होते. त्यांच्याकडे जेवण खाणे असायचे. गेले काही दिवसापूर्वी अपघात झाल्यामुळे ते आजारी होते. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मुलगा बाहेर असल्यामुळे मृतदेह शवगृहात राखून ठेवण्यात आला आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार प्रसाद कदम व त्यांचे सहकारी संतोष गलोले यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. याबाबतची माहिती श्री. गलोले यांनी दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा