प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष

प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष

दोडामार्ग :

कोरोनाची रुग्ण संख्या दोडामार्ग तालुक्यात झपाट्याने वाढत चालली आहे. असे असताना सर्व सामान्य नागरिक यांना नाहक अडवून ञास दिला जात आहे. पण कळणे येथून कित्येक दहा चाकी ट्रक खनिजभरून दोडामार्ग तहसीलदार कार्यालय समोरून गोवा राज्यात जात आहेत. महसूल विभाग यांच्या आशिर्वादाने ही अवैध वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांच्या पदाधिकारी यांनी तक्रार करुनही वेदांत सेसा गोवा कंपनीवर कारवाई झालेली नाही.

 

दोडामार्ग तालुक्यात पावसाळ्यात खनिज वाहतूक कोळसा वाहतूक यावर महसूल विभाग यांनी निर्बंध घालणे आवश्यक आहे. परंतु असे असताना देखील दोडामार्ग तालुक्यात कोरोना काळात ही अवैध वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग यांच्या डोळ्यांदेखत ही वाहतूक होत आहे तरी या गाड्या रोखल्या जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर वाहन चालक कोविड अधिनियम याचा भंग करून दोडामार्ग येथून गोवा अशी वाहतूक करत आहेत.

 

दोडामार्ग ते बांदा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. सासोली हेदूसवाडी येथे रस्ता साईडपट्टी खचली आहे. या धोकादायक रस्त्त्यावर कळणे मायंनिग खनिज वाहतूक करणारे ट्रक ये जा करतात त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शिवाय कळणे मायंनिग येथे या खनिज वाहतूक मुळे चिखल – माती रस्त्त्यावर आली आहे. याचे नागरीकांना आणि वाहन धारकांना परिणाम भोगावे लागत आहेत. वझरे येथील वेदांत सेसा मेटकोकच्या कोळसा प्लांटवर मोठ्या प्रमाणात गोवा येथून कोळसा भुकटी वाहतूक करणारे कित्येक डंपर कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर शासनाने घातलेले निर्बंध अटी पायदळी तुडवून दोडामार्ग येथे आयी चेक पोस्ट येथून राञी ते पहाटे उजेडेपर्यंत वाहतूक करतात. मोठ्या प्रमाणात महसूल बुडवून ही वाहतूक सुरू आहे. हा प्रकार भाजपाचे पदाधिकारी यांनी तहशीलदार यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच मोठ्या प्रमाणात होणारे प्रदुषण याकडे ही त्यांनी लक्ष वेधले. शिवाय शिवसेना पदाधिकारी यांनी खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी तक्रार केली. पण महसूल विभाग कडून कोळसा वाहतूक खनिज वाहतूक यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे आदेश पायदळी तुडवून या वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा