You are currently viewing जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी ज्येष्ठ लेखक,कवी विलासजी कुलकर्णी यांची काव्यरचना

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी ज्येष्ठ लेखक,कवी विलासजी कुलकर्णी यांची काव्यरचना

*पिंपळ पान*

मरतानाही हसतच गावे शिकवण हंसाची
ह्या पिंपळ पानाला ओढ लागली मातीची

राहील आठवण जगास या प्रेमळ जीवाची
शत शत नमन करुन भावना राहो प्रेमाची
जगून झाले जीवन कशाला चिंता उद्याची ?
ह्या पिंपळ पानाला ओढ लागली मातीची

आलो जन्मा रडत आता हसतच जाणार
पिकल्या देठाला आता सोसवेना पर्णभार
संपला मधुमास चाहूल लागली शिशिराची
ह्या पिंपळ पानाला ओढ लागली मातीची

मानव देवाच्या हातातील बाहुले कळसूत्री
अखंड हरिनाम मुखी करा मरेपर्यंत भक्ती
हसत निरोप द्यावा भीती कशाला यमाची
ह्या पिंपळ पानाला ओढ लागली मातीची

विलास कुलकर्णी
मीरा रोड
पत्ता : 402 सी 43 सेक्टर 8 शांती नगर मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे महाराष्ट्र 401107
फोन : 7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + three =