You are currently viewing परी ! तू या जगाची!

परी ! तू या जगाची!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*परी ! तू या जगाची!*

बाबा सांग मला!परीला रंग असतो कां?
बाबा सांग ना!
परीचा रंग असतो कां?……..!!
मी तुझी परी आहे ना!
आकाशातून उडत तुझ्याकडे आली
खरं आहे ना!बाबा
तू माझी परी!मला म्हणतोस ना!
परी आकाशात उडते
ती गोड गोड फार छान दिसते
मुकुट चांदण्याचा तिच्या
चमकत्या केसांवर असतो
तिचा चाॅकलेटचा बंगला असतो
हातांत तिच्या जादूई कांडी असते
राग आला की ती बेडूक करते
सांग ना बाबा! मी तुझी परी ना!
बाबा सांग!परीला रंग असतो कां?
आमच्या मॅडम म्हणाल्या
तुला परी होता येणार नाही
तुझा रंग गोरा नाही
परीला रंग असतो कां?बाबा!
सांग ना बाबा!सांग ना बाबा!
बबड्या तू माझी परी
आई आजू आजीची तू परी
या घराची !या जगाची तू परी
माऊची जोज्याची तू परी
अगं बाप्पाची !तूच परी
तुझ्या बाबासोबत आकाशात उडणारी
तुझ्या मॅडमना परी कळाली नाही
अग !परी त्यांनी पाहीलीच नाही
तू तुझी जादूची कांडी फिरवं
अन् बघ!तू परी झालीस की नाही
या जगाची सुंदर गोड परी
तुझ्या बाबाची परी……..!!!!

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा